म्हाडा कॉलनी दाताळा येथे जागतिक महीला दिन साजरा International Women's Day Celebration at Mhada Colony Datala

म्हाडा कॉलनी दाताळा येथे जागतिक महीला दिन साजरा
 
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: म्हाडा क्विन महिला क्रिकेट टीम कडून जागतिक महिला  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात महीला दिनाचे औचित्य साधुन महीलांचा सत्कार समारंभ कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच महीलांचे स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे  अध्यक्ष सौ. हर्षाताई वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. संगिता ठेंगणे, वीणा कालेजवार, सोनाली खडसे, ललिता संघर्थी उपस्थीत होत्या. यावेळी उपस्थितांचे मनोगतामध्ये महीलांसाठीच्या शासकीय योजनांची माहीती व महीला सशक्तीकरण, लघुउद्योग सुरु करुन आत्मनिर्भर होणे बाबत मार्गदर्शन केले. सौ. संगीता ठेंगणे यांनी "आम्ही नारी जगात भारी " अशी घोषणा देवुन सा-यांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रागिणी बेदले, प्रिया क्षिरसागर, स्वाती  लोनबले, मनीषा गायकवाड, माधुरी चीडे, छाया गौर, कल्याणी देवाळकर, निमा बुराडे , सूनिता कहूरके, प्रियंका चीडे, गेडाम ताई, भटवलकर ताई, गावंडे ताई व विद्या पिपळशेंडे यांनी अथक परिश्रम घेतले व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिमा विरुटकर यांनी केले.

International Women's Day Celebration at Mhada Colony Datala