▪️विदर्भाच्या 11 जिल्ह्यातील सुमारे 800 हून पत्रकार होतील सहभागी
▪️कृतिशील कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार चर्चा
#Loktantrakiawaaz
नागपूर (प्रतिनिधि) : पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणारी व्हॉईस ऑफ मीडिया'ही संघटना देशातील पत्रकारांसाठी हक्काची चळवळ बनली आहे. संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडियाचे जाळे 28 राज्यात व सर्व केंद्रशासित प्रदेशात पसरले आहे. संघटनेने 26 हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. या संघटनेचे विदर्भ विभाग अधिवेशन रविवार, 16 एप्रिल 2023 रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम (परवाना भवन) कस्तुरचंद पार्कजवळ नागपूर येथे होत आहे.
विदर्भस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मुख्य वक्ते म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांची उपस्थिती राहील.
अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष मनोगत आणि अहवाल सादरीकरण करतील. दुपारच्या दुसऱ्या सत्रात "बदलती पत्रकारिता आणि आव्हाने" यावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत आहे. यात श्रीपाद अपराजित (संपादक, महाराष्ट्र टाइम्स), देवेंद्र गावंडे (संपादक, लोकसत्ता), शैलेश पांडे (संपादक, तरुण भारत डिजिटल) आदी मान्यवर सहभाग घेतील. तिसऱ्या सत्रात व्हॉईस ऑफ मीडियाच्या विविध विंगचे प्रदेश अध्यक्ष मनोगत आणि सादरीकरण करतील.
पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा, उपायांवर मंथन होईल. व्हॉईस ऑफ मीडियाची भूमिका, भविष्यातील उपक्रम आदींची माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन पत्रकारांच्या हक्कासाठीच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक, पालक सचिव (विदर्भ) संजय पडोळे, संयोजक तथा जिल्हा अध्यक्ष आनंद आंबेकर, शहर अध्यक्ष फहीम खान, जिल्हाध्यक्ष सर्वश्री लक्ष्मीकांत बगाडे (बुलढाणा), अमर घाटरे (अमरावती), नंदकिशोर परसावार (भंडारा), भागवत मापारी (वाशिम), संजय राठोड (यवतमाळ), प्रमोद पाणबुडे (वर्धा), व्यंकटेश दुडमवार (गडचिरोली), संजय खांडेकर (अकोला), प्रमोद नागनाथे (गोंदिया) आणि विदर्भ कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
▪️ज्येष्ठ पत्रकार, मालक संपादकाचा सत्कार
पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार, संपादकाचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारमूर्तीत विजयबाबू दर्डा (माजी खासदार तथा एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह), श्रीकृष्ण चांडक (संपादक, दैनिक महासागर), प्रकाश कथले (ज्येष्ठ पत्रकार) श्रीधरराव सीताराम बलकी (चंद्रपूर), अनिल केशवराव पळसकर (बुलडाणा), वसंतराव ऋषीजी खेडेकर (बल्लारपूर), बाबूराव विठ्ठलराव परसावार (सिंदेवाही), रामभाऊजी नागपुरे, (सिर्सी, ता. उमरेड), शामराव मोतीराम बारई (ता. वडसा देसाईगंज), जि. गडचिरोली), विजय दत्तात्रय केंदरकर (अकोला), सुरज पाटील (यवतमाळ), विश्वंभर त्र्यंबक वाघमारे (बुलडाणा), रमेश मारोतराव दुरुगकर (ता. साकोली, जि. भंडारा), भाऊराव पंढरीनाथ रामटेके (ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांचा समावेश आहे.
▪️गर्जा महाराष्ट्र माझा
100 हौशी कलावंत एकत्रित येऊन महाराष्ट्राभिमान जागविणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाची निर्मिती स्पार्क जनविकास फाऊंडेशनने केली आहे. विदर्भातील 100 कलावंतांचा महाराष्ट्र संस्कृती दर्शन घडविणारा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता सादर होणार आहे.
Voice of Media convention to be held in Nagpur on Sunday
About 800 journalists from 11 districts of Vidarbha will participate
Discussions will be held as part of creative program
#Loktantrakiawaaz
Nagpur (Representative): Voice of Media, an organization that carries out creative activities for journalists and journalism, has become a rights movement for journalists in the country. The organization is expanding rapidly. Reaching every nook and cranny of the country in just two years, the network of 'Voice of Media' has spread to 28 states and all Union Territories. The organization has crossed the milestone of 26 thousand members. The Vidarbha Division Convention of this organization is being held on Sunday, 16th April 2023 at Kingsway Auditorium (Parwana Bhawan) near Kasturchand Park, Nagpur.
The Vidarbha level convention was inaugurated at 12 noon by Union Minister for Surface Transport and Highways Hon. no It will be done by Nitin Gadkari. Sandeep Kale, founder president of Voice of Media will preside over the event. On this occasion Hansraj Ahir, President of National Commission for Backward Classes, Sanjay Awte, Central Working President of Voice of Media, as Chief Speaker, Kishore Jorgewar, MLA of Chandrapur Assembly, Raja Mane, State President of Voice of Media, Anil Mhaske, State President of Voice of Media will be present as chief guests.
All the district presidents of Vidarbha will present a presentation and report in the session. In the second afternoon session, a seminar on "Changing Journalism and Challenges" is being held under the chairmanship of State Information Commissioner Rahul Pandey. Shripad Aparajit (Editor, Maharashtra Times), Devendra Gawande (Editor, Loksatta), Shailesh Pandey (Editor, Tarun Bharat Digital) etc. will participate in it. In the third session, regional presidents of various wings of Voice of Media will give lectures and presentations.
The problems of journalists will be discussed and solutions will be brainstormed. Information about the role of Voice of Media, future activities etc. will be given. Vidarbha President of Vice of Media Mangesh Khatik, Guardian Secretary (Vidarbha) Sanjay Padole, Convener and District President Anand Ambekar, City President Faheem Khan, District President Sarveshree Laxmikant Bagade (Buldhana), Amar Ghatre (Amravati), Nandkishore Parsawar (Bhandara), Bhagwat Mapari (Washim), Sanjay Rathod (Yavatmal), Pramod Panbude (Wardha), Venkatesh Dudamwar (Gadchiroli), Sanjay Khandekar (Akola), Pramod Naganathe (Gondia) and Vidarbha executive office-bearers. has done
▪️Senior Journalist, Proprietor Editor felicitated
Senior journalists, editors will be felicitated for their remarkable contribution in the field of journalism. Vijaybabu Darda (Former MP and Editor in Chief, Lokmat Newspaper Group), Shri Krishna Chandak (Editor, Daily Ocean), Prakash Kathale (Senior Journalist) Shridharrao Sitaram Balki (Chandrapur), Anil Keshavrao Palaskar (Buldana), Vasantrao Rishiji Khedekar (Ballarpur) were felicitated. Baburao Vitthalrao Parsawar (Sindevahi), Rambhauji Nagpure, (Sirsi, Distt. Umred), Shamrao Motiram Bari (Distt. Vadsa Desaiganj), Distt. Gadchiroli), Vijay Dattatray Kenderkar (Akola), Suraj Patil (Yavatmal), Vishwambhar Trimbak Waghmare (Buldana), Ramesh Marotrao Durugkar (Sakoli, District Bhandara), Bhaurao Pandharinath Ramteke (Lakhandur, District Bhandara) included. is
▪️Garja Maharashtra maja
The program 'Garja Maharashtra Maja', where 100 amateur artists come together to make Maharashtra proud, has been created by Spark Janvikas Foundation. A program of 100 artists from Vidarbha showcasing Maharashtra culture will be presented at 4.30 pm.