महिला रोजगार मेळावा व शिक्षणा संदर्भात आढावा बैठक संपन्न, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने A review meeting regarding women's employment fair and education was held on behalf of Tathagata Group Maharashtra State Association

महिला रोजगार मेळावा व शिक्षणा संदर्भात आढावा बैठक संपन्न

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने

चंद्रपुर: पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा (बोरकर) येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रशांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये जाऊन महिलांना संघटनेच्या धेय्य धोरणे व कार्याची माहीती दिली असता संघटना महिलानां सक्षमपणे उभे कसे करत आहे व महिलांना रोजगार संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याच्याकामाबद्दल माहिती देण्यात आली व गोरगरीब मुलांना शिक्षण घेता येत नसेल त्याकरिता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेने मुलांनच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे व लवकरच प्रत्येक जिल्ह्यात रोजगार, शिक्षण उपलब्ध करण्याचे काम तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी हाती घेतले आहे.
यावेळी तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पोंभुर्णा गावातील महिला ह्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

A review meeting regarding women's employment fair and education was held on behalf of Tathagata Group Maharashtra State Association