महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान Three policemen from Maharashtra were awarded 'Shaurya Award' by the President

महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान

#Loktantrakiawaaz
नवी दिल्ली, 9 में : पोलीस सेवेत अदम्य साहसाचा परीचय देणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलीसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) सोमय मुंडे, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम यांना नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीसाठी ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमात 29 शौर्य पुरस्कार आणि 8 किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच मरणोपरांत पुरस्कारांचा समावेश आहे.

Three policemen from Maharashtra were awarded 'Shaurya Award' by the President

 #Loktantrakiawaaz
 New Delhi, May 9: Three policemen from Maharashtra who have demonstrated indomitable courage in police service were today honored with the 'Shaurya Award' by President Draupadi Murmu.

 The 'Shaurya Award' distribution ceremony was organized today at the Durbar Hall of Rashtrapati Bhavan.  Shaurya Puraskar and Kirti Chakra were conferred on the occasion by the President.  The program was attended by Vice President Jagdeep Dhankhad, Prime Minister Narendra Modi, Defense Minister Rajnath Singh and other cabinet ministers.

In this event, Indian Police Service (IPS) Somay Munde, Police Naik Tikaram Katenge and Police Constable Ravindra Netam were honored with 'Shaurya Upasaraka' for their actions against Naxalites.

29 Shaurya Awards and 8 Kirti Chakras were presented at the event held today.  These include five posthumous awards.