संजय बापुराव कुळमेथे, कोतवाल, साजा पारडी, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर यांना लाच मागणी प्रकरणात अटक
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर (कोरपना): तक्रारदार हे मौजा कोरपणा येथील रहीवासी असून तक्रारदार यांचे दोन्ही मुलांच्या नावे भोगवटदार वर्ग-२ मध्ये असलेल्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग-१ मध्ये करून देण्याच्या कामाकरीता वरिष्ठांच्या नावाने श्री. कुळमेथे, कोतवाल यांनी तक्रारदार यांचेकडे २०००/- रू. लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची श्री. कुळमेथे यांना लाच म्हणून २०००/- रु. लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने श्री. कुळमेथे यांचे विरुद्ध लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ११/०७/२०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान गैर अर्जदार संजय बापुराव कुळमेथे, कोतवाल, साजा पारडी, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना वरिष्ठांच्या नावाने २,०००/-रु. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. १२/०७/२०२३ रोजी पोलिस स्टेशन कोरपणा, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, पो.नि. जितेंद्र गुरनुले तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे व चापोकॉ सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.