अखेर अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं ते पावरफुल खातं मिळालंच Finally, Ajit Pawar got the powerful account that Devendra Fadnavis had

अखेर अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं ते पावरफुल खातं मिळालंच

मुंबई: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील एकूण 9 आमदारांनी 2 जुलै रोजी बंडखोरी केली. त्यानंतर अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. तर त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पवार गटाच्या या शपथविधीनंतर शिवसेना शिंदे गटात कुठेतरी नाराजी पाहायला मिळत होती. इतकंच नाही, तर काही विद्यमान मंत्र्यांकडून खाती काढण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. तर दुसऱ्या बाजूला अर्थ खात्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही होते. त्यामुळे खातेवाटपाकडे लक्ष लागलेलं होतं.

या खातेवाटपासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्रंदिवस बैठका सुरु होत्या. अखेर शपथविधीच्या 12 दिवसांनंतर बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आलं. खातेवाटपात फेरबदल करण्यात आलंय. या खातेवाटपात अजित पवार यांना त्यांना हवं असलेलं खातं मिळवण्यात यश आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं अर्थ खात्याची जबाबदारी ही आता अजित पवार सांभाळणार आहेत. त्यामुळे आता अजित पवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असणार आहेत.

Finally, Ajit Pawar got the powerful account that Devendra Fadnavis had