आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २४ नागरिक सुरक्षित स्थळी, चंद्रपुर शहर महानगर पालिका शाळांत ३१२ नागरिक आश्रयास Under disaster management, 24 citizens have been sheltered in safe places, 312 citizens have been sheltered in Chandrapur City Municipal Schools

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २४ नागरिक सुरक्षित स्थळी

चंद्रपुर शहर महानगर पालिका शाळांत ३१२ नागरिक आश्रयास

चंद्रपूर २८ जुलै -  वर्धा नदी पूर्ण भरून वाहत असल्याने तसेच इरई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ठराविक अंतराने काही पाणी सोडत येत असल्याने शहरात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे चंद्रपुर शहरातील --नागरिकांनी मनपा शाळेत आश्रय घेतला तसेच ---नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
   वडगाव मागील परिसर,जगन्नाथ बाबा नगर, ठक्कर कॉलनी परिसर, सिस्टर कॉलनी मागील परिसर, रहमत नगर फिल्टर प्लांट परिसर, शांतीधाम मागील परिसर, चोराळा रोड इरई नदी परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड मागील परिसर, पठाणपुरा गेटच्या बाहेरील परिसर, जमननजेट्टी परिसर, भंगाराम मंदिर, तुळजाभवानी हनुमान खिडकी परिसर, अंचलेश्वर गेट बाहेरील परिसर या सर्व ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवत असल्याने मनपा अधिकारी कर्मचारी २४ तास अलर्ट मोडवर असुन नदी पात्रा लगतच्या नागरिकांनी कुठलीही जोखीम न घेता जवळच्या मनपा शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.
 पूर परिस्थिती मुळे म. ज्योतिबा फुले प्रा. शाळा येथे १३८, किदवाई शाळा, घुटकाळायेथे -१७, माना प्रा. शाळा, लालपेठयेथे ४२, नागाचार्य मंदिर, महाकाली वार्ड येथे  २८, महाकाली प्रा. कन्या शाळा येथे  ५३, शहीद भगत सिंह शाळा येथे  - ३४ असे एकुण ३१२ नागरिक मनपा शाळेत आश्रयास आहेत.शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या तसेच ११४ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात येत आहेत. आपात्कालीन परिस्थितीत १६ जुलै रोजी  ८०, २३ तारखेस २४ नागरिक तर २८ जुलै रोजी पाण्यात अडकलेल्या २४ नागरिकांना रेस्क्यु करून मनपा आपत्ती व्यवस्थापन चमुने सुरक्षित स्थळी हलविले आहे.      
  वाढते पाणी पाहता सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी 07172254614,07172259406 (101),8975994277,9823107101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Under disaster management, 24 citizens have been sheltered in safe places, 312 citizens have been sheltered in Chandrapur City Municipal Schools

Under disaster management, 24 citizens have been sheltered in safe places, 312 citizens have been sheltered in Chandrapur City Municipal Schools