चंद्रपूर : भारतीय जैन संघटना चंद्रपूरच्या वतीने २७ ऑगस्ट २०२३ रोजी भद्रावती येथील श्री स्वप्नदेव केसरीया पार्श्वनाथ जैन मंदिरात स्व. किरीटभाई बाबरीया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ' "बंधन २०२३" अंतर्गत जैन समाजातील उच्चशिक्षित वधू- वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आपल्या धर्माबद्दल अतुट विश्वास असलेल्या जैन समाजाने काळानुरूप स्वतमध्ये बदल घडवून आणले. आजच्या युगातील तरुण तरुणींना योग्य जोडीदार मिळावा, त्यांचे वैवाहिक जीवन मंगलमय असावे, या हेतूने वधू-वर परिचय संमेलनाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या सोहळ्यासाठी जैन समाजातील २१ ते ३५ वर्षे वयोगटातील विवाह इच्छुक युवक-युवतींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रशांत बंद, नितीन पुगलिया, गोतम कोठारी, दीपेंद्र पारख आदींनी केले.
BJS Bride and groom introduction meeting at Bhadravati on behalf of Bhartiya Jain Sanghatna Chandrapur
#BJS # BrideGroomIntroduction #Bhadravati #BhartiyaJainSanghatna #Chandrapur #ParichaySammelan
#BJSPune