अन्नत्याग आंदोलनाला भावसार समाजाचा पाठिंबा Bhavsar community's support for food sacrifice movement

अन्नत्याग आंदोलनाला भावसार समाजाचा पाठिंबा

चंद्रपूर :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रात रान उठविले आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये याकरिता रवींद्र टोंगे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांना भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर कडून  अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण समर्थनाचे पत्र देण्यात आले. महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात 346 जाती असून 19 % टक्के आरक्षण मिळते आहे. त्यात मराठा समाज समाविष्ट झाल्यास ओबीसी समाजाचे समीकरण बिघडेल. मराठ्यांना कुणबी असे प्रमाणपत्र देण्यावर आमचा आक्षेप आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही असे राज्य सरकारने जाहीर केले ही बाब स्वीकार्य आहे.परंतु शासनाने ओबीसी समाजाला आस्वस्थ करण्याकरिता संवाद, चर्चा ला बोलविण्यात यावे. बिहार राज्याच्या धरतीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना योग्य न्याय द्यावा. आम्ही मराठा समाज आरक्षणाच्या विरोधात नाही. त्यांना ओबीसी वगळून आरक्षण देण्यात यावे. राज्य सरकारने ओबीसी प्रवर्ग दुखावल्या जातील असे अन्यायकारक कुठलेही पावलं उचलू नये. आणि जर का ओबीसी विरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरू शकतात याची शासनाने दखल घ्यावी. रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला ओबीसी प्रवर्गातील सर्व बांधवांनी तन मन धनाने सक्रिय पाठिंबा दर्शवावा जेणेकरून ओबीसी आरक्षणावर कुठलाही आघात होणार नाही. भावसार समाजाच्या शिष्टमंडळात अलोक साधनकर, योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, वैशाली भागवत, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुशील भागवत, मीनाक्षी आलोणे, कमल अलोणे, भावसार समाजाचे समाजबांधव उपस्थित होते.

Bhavsar community's support for food sacrifice movement