सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर, आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात प्रश्‍न लावताच तीन दिवसात प्रलंबित प्रश्‍न निकाली, शिष्यवृत्तीबाबत शासन निर्णय निर्गमित Scholarship approved for students of Sainik School Chandrapur, MLA Sudhakar Adabale took out the question pending in the auditorium for three days, government decision issued regarding scholarship

सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर 

आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात प्रश्‍न लावताच तीन दिवसात प्रलंबित प्रश्‍न निकाली

शिष्यवृत्तीबाबत शासन निर्णय निर्गमित

चंद्रपूर : महाराष्ट्रातील सैनिक स्कूल चंद्रपूर येथील अनुसूचित जाती - जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. याबाबत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्‍याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्‍य पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी १२ डिसेंबर २०२३ रोजी सभागृहात केली होती. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती - जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागत होता. 

आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नामुळे या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर तातडीने कारवाई होऊन तीन दिवसात सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामुळे सदर विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळेल व पुढेही शिष्यवृत्ती मिळत राहील. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळेल आणि त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहील. 

आमदार अडबाले यांच्या प्रश्‍नामुळे हा ५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न निकाली निघाल्‍याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांचे सैनिकी स्‍कूल चंद्रपूर पालक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Scholarship approved for students of Sainik School Chandrapur, MLA Sudhakar Adabale took out the question pending in the auditorium for three days, government decision issued regarding scholarship

#Scholarship-approved-for-students-of-Sainik-School-Chandrapur   #MLA-Sudhakar-Adabale  #government-decision-issued-regarding-scholarship #chandrapur #Sainik-School  #Sudhakar-Adabale #Scholarship