चंद्रपुर तालुक्यातील तलाठी अडकल्या लाच लूचपत विभागाच्या जाळ्यात Talathi of Chandrapur taluka got caught in the net of bribery department, Talathi office Saja Incident at Chandrapur

चंद्रपुर तालुक्यातील तलाठी अडकल्या लाच लूचपत विभागाच्या जाळ्यात

तलाठी कार्यालय साजा, क. ४ नागाळा ता. जि. चंद्रपूर येथील घटना

चंद्रपूर : चंद्रपुर तालुक्यातील तलाठी कार्यालय साजा, क. ४ नागाळा ता. जि. चंद्रपूर येथील तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार यांचे विरुध्द ५०००/- रूपये मागणी करून तडजोडीअंती ४०००/- रू स्विकारल्या संबंधाने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा सिदुर, पो. पिंपरी (धानोरा), ता. जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे नावे असलेली मौजा सिदुर, पो. पिपरी (धानोरा), ता. जि. चंद्रपूर येथील शेतजमीन तक्रारदार व तक्रारदार यांच्या पत्नीचे आणि तक्रारदार यांचे मुलाचे नावे बक्षिसपत्र करुन दिले होते. सदर बक्षिसपत्र करून दिलेली शेतीचे फेरफार करण्याचे कामाकरीता तक्रारदार हे मौना नागाळा येथील तलाठी कार्यालय येथे जाऊन तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार यांचेकडे अर्ज केला होता. तकारदार हे काही दिवसानंतर सदर अर्जाची चौकशी करण्याकरीता तलाठी कार्यालय नागाळा येथे गेले असता तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार यांनी फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता ५०००/- रूपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरबार यांस लाच रक्कम देण्यानी मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकान्यांना भेटुन तक्रार नोंदविली.

प्राप्त तक्रारीवरून आज दिनांक ०७/०३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील यांनी तकारदाराने दिलेल्या उकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी/सापळा कारवाईचे आयोजन केले, त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार यांनी शेतीचे फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता तडजोडीअंती ४०००/-रू लाचेगी मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून तलाठी कार्यालय साजा क. ४ नागाळा, ता. जि. चंद्रपूर येथे पंचासमक्ष कार्यवाहीदरम्यान महिला आ.लो.से. श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडुरवार, तलाठी, तलाठी कार्यालय नागाळा यांना ४०००/- रूपये लाथ रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाहीश्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. हिवराज नेवारे, नापोशि रोशन बांदकर, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, म.पो.अ. पुष्या काचोळे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व मा.पी.अ. रामेश्वर पाल मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे.

Talathi of Chandrapur taluka got caught in the net of bribery department, Talathi office Saja, K.  4 Nagala hrs.  Dist.  Incident at Chandrapur

#acb #chandrapur #Nagala  #Talathi-of-Chandrapur-taluka-got-caught-in-the-net-of-bribery-department  #Talathi-office  #Nagala  #Incident-At-Chandrapur