पत्रकार हर्षल भदाणे यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची मदत ! व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर मदत व तपासाची चक्रे वेगवान The family of journalist Harshal Bhadane received one million aid from the Chief Minister! Aid and investigation cycles speed up after voice of media demands



पत्रकार हर्षल भदाणे यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची मदत !

व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर मदत व तपासाची चक्रे वेगवान

मुंबई, ता. ३१ जुलै : पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत  केली आहे. सदर परिवाराला मदत करावी व अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित दादा कुंकूलोळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. 
देशभरातील पत्रकारांच्या हितासाठी व समस्यांकरिता व्हाॅईस ऑफ मीडिया सदैव तत्पर राहते. हर्षल भदाणे यांच्या मृत्यूनंतर तातडीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री यांच्या सोबत संपर्क साधून तातडीने या घटनेचा तपास करण्यात यावा व भदाने यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी केली होती.
 त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दोन पथके चौकशीसाठी रवाना केली होती. लगोलग मुख्यमंत्र्यांनी देखील आज या परिवाराला दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. 
संदीप काळे यांच्या शी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी हर्षल भदाणे यांच्या पत्नीबाबतही सकारात्मक विचार करून कुटुंब सावरण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.