याच जागेवर वाहने पार्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : 15 व 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभुमी येथील समारंभास उपस्थित राहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायी / नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी, समारंभास येणा-या अनुयायांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच प्रवेश व निर्गम याचे विनियमन करण्याकरीता चंद्रपूर शहर आणि बाहेरून येणा या वाहनांकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी 15 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजतापासुन 17 ऑक्टोबरचे सकाळी 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील खालील नमुद स्थळे सर्व वाहनाकरीता "पाकींग स्थळ" म्हणून घोषित केले आहे.
1. नागपूर रोडने दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) शकुंतला लॉन ब) जनता कॉलेज पटांगण क) जनता कॉलेज समोरीत ईदगाह मैदान.
2. शहरातून दिक्षाभुमी कडे येणा-या वाहनांकरीता : अ) सेंट मायकल स्कूल मैदान ब) सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक) क) न्यु इंग्लीश ग्राऊंड
3. वडगाव, आकाशवाणी व लगतच्या परीसरातून दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयमच्या मागे) ब) जिवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे)
4. मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परीसरातून येणा-या वाहनांकरीता : अ) कृषि भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टैंड.
On the occasion of Dhammachakra implementation day, the parking space for vehicles has been fixed in Chandrapur city, an appeal to park vehicles at this place
#Chandrapur-Dhammachakra- implementation-Day
#Chandrapur
#Dhammachakra-Implementation-Day