चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यात ही परीक्षा एकूण 17 केंद्रावर दोन सत्रामध्ये होणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील 7890 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 करीता 2914 उमेदवार व पेपर-2 करीता 4896 उमेदवार परीक्षा देणार असून परीक्षेची सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2.30 ते सांय.5 वाजेपर्यंत आहे. परीक्षार्थ्यांना सकाळच्या पेपरला 10.10 वाजेपर्यंत पर्यंत तर दुपारच्या पेपरला 2.10 वाजेपर्यंत परीक्षा दालनात येण्याची परवानगी राहील. सदर परीक्षेदरम्यान सी.सी.टी.व्ही. कॅमेरे राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच परीक्षेकरीता मुळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राव्हींग लायसन्स कोणतेही एक ओळखपत्र अनिवार्य राहील, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी यांनी कळविले आहे.
Teacher Eligibility Test on 10th November
#TeacherEligibilityTestOn10thNovember
#TeacherEligibilityTest
#Teacher
#EligibilityTest