किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण रविवारी चंद्रपूरात, "या" मार्गे होणार रोड शोच्या माध्यमातून करणार प्रचार Andhra Pradesh Deputy Chief Minister Star Pawan Kalyan will campaign for Kishore Jorgewar in Chandrapur on Sunday through a road show

किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण रविवारी चंद्रपूरात

"या" मार्गे होणार रोड शोच्या माध्यमातून करणार प्रचार

चंद्रपुर: आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर, रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, सकाळी 11 वाजता रोड शोच्या माध्यमातून ते आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार करणार आहेत.
चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून त्यांच्या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहिर सभा पार पडल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे.
  दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पावर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे. येत्या 17 नोव्हेंबरला, रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत. सकाळी 11 वाजता बागला चौक, गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे. तरी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Andhra Pradesh Deputy Chief Minister  Star Pawan Kalyan will campaign for Kishore Jorgewar in Chandrapur on Sunday through a road show 

#AndhraPradeshDeputyChiefMinister #Power 
#StarPawanKalyan 
#campaign 
#KishoreJorgewar 
#Chandrapur
#RoadShow