विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांवर चंद्रपुर वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे कारवाईचा दणका Action taken by Chandrapur Traffic Control Branch against motorists riding two-wheelers without helmets

File Photo 
विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांवर चंद्रपुर वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे कारवाईचा दणका

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर, 18 डिसेंबर: चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-१९८८ कलम १२९ अन्वये सगळीकडेच सक्तीचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत दुचाकीचे एकुन ३८४ अपघात झाले असुन त्यात १९४ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यापैकी १६६ दुचाकी स्वार गंभिर जखमी झाले आहेत.

हेल्मेट बाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक धोरण अवलंबलेला असुन चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न परीधान करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उददेश अपघातामध्ये मृत्युदराचे प्रमाण कमी करणे हे आहे.

त्यामुळे दिनांक १०/१२/२०२४ ते दिनांक १७/१२/२०२४ पावेतो वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व सर्व पोलीस स्टेशन तर्फे हेल्मेट बाबत विशेष मोहिम राबवुन ४३०० हेल्मेटच्या कारवाई करण्यात आले. त्यापैकी वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर तर्फे ३४९३ कारवाई व पोलीस स्टेशन तर्फे ८०७ हेल्मेटच्या कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १७/१२/२०२४ रोजी विसापुर येथील टोलनाक येथे वाहतुक शाखा तर्फे एकुण १०९७ हेल्मेटच्या कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करीत असतांना बरेच नागरीकाचे तक्रारी आहेत की, कारवाई करण्याच्या अगोदर माहिती देणे गरजेचे आहे. यापुर्वी वारंवार नागरीकांना हेल्मेट वापरण्याबाबत प्रेसनोट जारी करण्यात आलेली असुन सुध्दा बरेचसे नागरीक हे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान न करता दुचाकी चालवितात. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होतात. नागरीकांची सुरक्षा करीता सदरची मोहिम आम्ही संपुर्ण चंद्रपुर जिल्हयात राबवित आहोत.

तरी सर्व नागरीकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान करावे. चंद्रपूर जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा याबाबत जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.

Action taken by Chandrapur Traffic Control Branch against motorists riding two-wheelers without helmets

#ActiontakenbyChandrapurTrafficControl Branchagainstmotoristsridingtwo-wheelerswithouthelmets

#ActiontakenbyChandrapurTrafficControl Branch 
#motorists 
#ridingtwo-wheelers 
#withouthelmets
#Helmets 
#ChandrapurTrafficControl
#TrafficControl
#Chandrapur