12 वी चा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर
#Loktantra Ki Awaaz
मुंबई: बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मे 2025 पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.
Class XII exam from tomorrow, 12th result will be announced on 'this' day
#ClassXIIexam from tomorrow
#12thresult
#MaharashtraClassXIIexam
#stateboardClassXIIexam