चंद्रपूर जिल्ह्यातील लोंढोली येथील ग्रामसेवकाला लाच घेताना अटक, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर गृहनिर्माण योजनेसाठी लाच मागितली Gram sevak from Londoli in Chandrapur district arrested while taking bribe, demanded bribe for approved housing scheme under Pradhan Mantri Awas Yojana

💰चंद्रपूर जिल्ह्यातील लोंढोली येथील ग्रामसेवकाला लाच घेताना अटक,

🏡 पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर गृहनिर्माण योजनेसाठी लाच मागितली

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, 26 फेब्रुवारी : सिंदेवाही तालुक्यातील लोंढोली येथील ग्रामसेवक चंद्रशेखर केशव रामटेके यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या निधीच्या बदल्यात 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे लोंडोली गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांच्या नावे 1,20000/- रुपये मंजूर झाले आहे, त्यांना रुपयांचा पहिला हप्ता 15,000/- रुपये मिळाला आहे, दुसरा हप्ता 70,000/- मंजुरी साठी  ग्रामसेवक चंद्रशेखर यांनी 20 हजार रुपये मागितली. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रूपये नंतर स्विकारण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, तक्रारदाराने 25 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार 26 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत सुरू होती. ही कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले व त्यांच्या पथकाने केली.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Gram sevak from Londoli in Chandrapur district arrested while taking bribe,

demanded bribe for approved housing scheme under Pradhan Mantri Awas Yojana

#Gramsevak𝗙romLondoliinChandrapurdistrictarrestedwhiletaking𝘉𝘳𝘪𝘣𝘦
 #demandedb𝗿𝗶𝗱𝗲 
#PradhanMantriAwasYojanademandedbribeforapprovedhousingschemeunderPradhanMantriAwasYojana
#𝗣𝗠𝗔𝘄𝗮𝘀𝘆𝗼𝗷𝗮𝗻𝗮𝗯𝗿𝗶𝗯𝗲
#𝗔𝗖𝗕𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿
#𝗔𝗖𝗕𝗔𝗿𝗿𝗲𝘀𝘁𝗚𝗿𝗮𝗺𝘀𝗲𝘃𝗮𝗸
#𝗚𝗿𝗮𝗺𝘀𝗲𝘃𝗮𝗸𝗔𝗿𝗲𝗲𝘀𝘁
#𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿