जैन समाजाच्या जैन साधू साध्वी साठी विश्रांती घेण्यासाठी व मुक्कामी राहण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विहार धाम बनविण्या यावे - महेंद्र मंडलेचा A vihara should be built in Chandrapur Gadchiroli district to rest and stay for the Jain monks of the Jain community - Mahendra Mandlecha

जैन समाजाच्या जैन साधू साध्वी साठी विश्रांती घेण्यासाठी व मुक्कामी राहण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विहार धाम बनविण्या यावे - महेंद्र मंडलेचा 

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर: जैन समाजाच्या जैन साधू साध्वी साठी विश्रांती घेण्यासाठी व मुक्कामी राहण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विहार धाम बनविण्या यावे या बाबत निवेदन  मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस
पालक मंत्री - गडचिरोली जिला, डाॅ अशोक उईके मंत्री-आदिवासी विकास व पालकमंत्री चंद्रपूर जिला, आमदार सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री व पालकमंत्री आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर-विधानसभा क्षेत्र, आमदार देवराव भोंगळे राजुरा-विधानसभा क्षेत्र, आमदार करण देवतळे वरोरा-भद्रावती विधानसभा यांना निवेदन देवुन मांगनी करण्यात आली. सकल जैन समाजाचे साधू / साध्वी (संत) हे चार महीने पावसाळ्यात एकाच ठिकाणी रहातात (चातुर्मास मध्ये) व नंतर चे आठ महिने जैन आगम व नियमा नुसार एक ठिकाणहुन दुसऱ्या ठिकाणी जैन उपदेश व धर्मीक कार्यासाठी 10 ते 15 किलोमीटर पायी चालुन पुढे प्रवास (विहार) करता.
चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात काही वर्षां मध्ये छत्तीसगढ़, मध्यप्रदेश राज्या मधुन महाराष्ट्र व दक्षिण राज्यात (तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिलनाडु) मध्ये जाण्यासाठी तसेच दक्षिण राज्यातुन छत्तीसगड, मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्र राज्य मध्ये पायी भ्रमण करने सोईचे झाले असल्याने असंख्य जैन साधू - साध्वी या दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा व राज्य मार्गा वरुन सतत आठ महीने पायी जाणे - येणे करत असता. जैन धर्मच्या नियमानुसार जैन धर्माचे साधू - साध्वी एकत्र विहार करत नाही व एकाच ठिकाणी पण राहत नाही व त्यांच्या सोबत जैन श्रावक /‌श्राविका पण राहु शकत नाही.
 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात जैन समाजची लोकसंख्या कमी आहे व जैन समाजाचे दोन्ही जिल्ह्यांत वस्ती काहीच ठिकाणी असल्याने अश्या परिस्थितीत जैन साधू / साध्वी यांना शुध्द व सात्विक शाकाहारी आहार कुठेही मिळत नाही तसेच सुर्योदय व सुर्यास्त पर्यन्तच आहार घेता आणि पायी विहार करत असल्याने रात्री विश्रांती / मुक्काम साठी जागा पण मिलत नाही सुरक्षेच्या दृष्टीने अश्या वेळेस उग्र विहार 15 / 20 कि. मी. पेक्षा ही जास्त करावे लागते किवा जवळच्या गावात मिळेल तेथे असुरक्षित किवा सुमसान जागेवर मिळेल त्या अवस्थेत विश्रांती व मुक्काम करावे लागते.
चंद्रपूर / गडचिरोली जिल्ह्य मध्ये जास्त वनक्षेत्र आहे व काही भागात दुर्मिळ लोक संख्या व शुद्ध शाकाहारी घरे मिळत नाही अश्या परिस्थितीत साधु, साध्वी ना शुध्द पाणी व आहार पण मिळत नसल्याने पायी चालुन झाल्यावर नंतर उपवास (सुर्यास्त नंतर अन्न, पाणी घेणे चालत नाही) करावे लागते.
अश्या परिस्थिती मध्ये जैन साधू आणि साध्वी ना कठीण परिस्थिती मधून निघावे लागते. सकल जैन समाज कडुन विनंती की चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हद्दीत किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रातील राज्य व जिल्हा महामार्गवर तरि  जैन साधू, साध्वी व इतर धार्मिय शुद्ध शाकाहारी संतांना विश्रांती करण्यासाठी सुरक्षीत जागेवर प्रत्येकी 15/20 कि मी च्या अंतरावर 1000 फुट जागे वर 2BHK चे " विहार धाम " बनवून जैन व सनातनी धर्माचे साधू / साध्वी ला शूध्द शाकाहारी आहर घेण्यासाठी, विश्रांती किंवा मुक्कामी रहाण्यासाठी बनविणे फार अवश्य आहे.
 साधु संताची पावन भुमी महाराष्ट्र  मधील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात संताच्या सेवे साठी महाराष्ट्र राज्यत सर्व प्रथम "विहार धाम" आपल्या आमदार निधी, किंवा खनिज विकास निधी किंवा आपल्या प्रयत्नांनी जो नीधी मिळेल त्या नीधी मधुन संता साठी बनवुन पुण्याचे सेवा कार्य करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करावे आपले हातुन होणारे अनेक विकासाचे अस्मरणीय झाले आहे त्या मध्ये‌ एक पुण्यचे काम पण जरूर करावे। ही नम्र विनंती.
तसेच विहार धाम ची सर्व देखरेख वेवस्था चांगली व शाकाहारी, व्यसन मुक्त व पवित्र रहावी म्हणून जैन समाजाच्या न्यास मध्ये रजिस्टर ट्रस्ट असलेल्या संस्थानाच देण्यात यावी। हि मागणी व नम्र विनंती महेंद्र मंडलेचा यांनी केली आहे.

A vihara should be built in Chandrapur Gadchiroli district to rest and stay for the Jain monks of the Jain community - Mahendra Mandlecha