राष्ट्रसंत आनंदऋषीजीच्या पुण्यतिथी निमित्त गुणानुवाद सभा संपन्न
स्व मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ फिरत्या पाणपोईचे लोकार्पण
#Loktantra Ki Awaaz
जळगाव, दि.२८ मार्च (प्रतिनिधी) - प.पू. आनंदऋषीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणानुवाद सभा सकाळी ९.०० वाजता प्रवचना दरम्यान स्वाध्याय भवन येथे संपन्न झाली. आचार्य धीरजमुनीजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती महासतीजी प.पू. श्री. विमलाजी म.सा आदी ठाणा ४ यांच्या उपस्थितीत आचार्यश्रींचे पुण्यस्मरण करत "आनंद चालिसा"चे सामुहीक पठन उपस्थित भक्तांनी केले.
आचार्यांनी 'श्रमण संघ परंपरे'ची व्याप्ती वाढविली. असे महात्मे शतकात एखाद दुसरेच अवतरतात आणि जनकल्याणासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचतात. त्यांच्या ठायी असलेली समता व समतेचा भाव आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय व मार्गदर्शक आहे. या वेळी अशोक जैन यांची श्रमण संघ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आनंद ग्रुप तर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आचार्यश्रींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून माजी नगरसेवक अमर जैन मित्रमंडळातर्फे सुश्रावक स्व. मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ फिरत्या पाणपोईचे लोकार्पण जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रकल्पा साठी प्रवीण पगारिया व चंद्रशेखर राका यांनी विशेष प्रयत्न केलेत.
या प्रसंगी महासतीजींनी कुणासाठी पेयजल व्यवस्था उपलब्ध करून देणे मोठे पुण्यार्जन करण्याचे साधन असल्याचे म्हटले. शंकरलाल कांकरिया, स्वरूप लुंकड़, शांतीलाल बिनायक्या, माणकचंद सांड, नंदलाल गादिया, संध्या कांकरिया, माजी नगरसेवक अमर जैन, मनीषा डाकलिया, किशोर भंडारी, तेजस कावड़िया, नरेंद्र बंब, नितीन चोपडा, संजय रेदासनी आदी श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Gunanuvada Sabha held on the occasion of the death anniversary of national saint Anand Rishiji
Dedication of a rotating water fountain in memory of the late Motibhau Jain