#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर: दिल्ली स्थित 'इकॉनॉमिक ग्रोथ फाउंडेशन' (EGF) या संस्थे तर्फे चंद्रपूर येथील एड. योगिता रायपूरे यांना नुकताच विमेन डिस्टिंक्शन अवार्ड फॉर सोशल एंड एजुकेशन डेवलेपमेंट हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील एकंदरीत कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
ऍड. योगिता रायपूरे या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्या एक उत्तम लेखिका, कवयित्री आणि वक्त्या आहेत. त्यांचे अनेक कार्यक्रम नियमितपणे आकाशवाणी आणि आवाज इंडीया, लार्ड बुद्धा या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होत असतात. त्या सामाजिक प्रबोधन, संविधान जनजागृती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे तसेच मार्गदर्शन आणि गरजू व्यक्तींना नेहमी मदत करण्यास तत्पर असतात. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व्दारा त्यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविले आहे. अनेक संस्था कङून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना गौरांवित करण्यात आलेले आहेत. विषम परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे विषम परिस्थिति काय असते? याची त्यांना पूर्ण जाणिव आहे. त्यांना हा पुरस्कार महिला दिनानिमित्त दिल्ली येथे फाउंडेशनच्या राष्ट्रीय समीट मध्ये प्रदान करण्यात येत असून त्यांच्या या पुरस्काराच्या निवडी बद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Women's Distinction Award for Social and Education Development announced to Yogita Raipure
#Women'sDistinctionAwardforSocialandEducationDevelopmentannouncedtoYogitaRaipure
#Women'sDistinctionAward for
#SocialandEducationDevelopment #announced
#Yogita Raipure
#Chandrapur