जिल्हाधिका-यांच्या हस्ते चंद्रपुरचे नवीन जिल्हा माहिती कार्यालयाचे उद्घाटन Chandrapur's New District Information Office inaugurated by the District Collector

जिल्हाधिका-यांच्या हस्ते चंद्रपुरचे नवीन जिल्हा माहिती कार्यालयाचे उद्घाटन

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 19 मे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा आराखड्याअंतर्गत चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नुतणीकरण करण्यात आले असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते आज (दि. 18) सदर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी कार्यालयाची पाहणी केली. तसेच लोकराज्य वाचन कक्षात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चांगला अभ्यास करा. काही अडचणी असल्यास सांगा. साधनसामुग्रीची कमतरता असल्यास त्वरीत उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही सुध्दा दिली. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, लिपिक-टंकलेखक सचिन खोब्रागडे, सहायक छायाचित्रकार निखील सोनवणे, सहायक संघर्ष कांबळे, क्षितिज किटे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयात आता अधिकारी – कर्मचा-यांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रत्येक कक्षावर नामफलक अभ्यागतांसाठी प्रतिक्षालयाची निर्मिती, तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात पत्रकारांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती, लोकसेवा हक्क कायदा आणि माहिती अधिकार कायद्याची माहिती लावण्यात आली आहे. तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी दर्शनी भागात डीजीटल स्टँडीसुध्दा आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या सोशल मिडीयाचे (फेसबुक, एक्स, ब्लॉग, युट्युब, इंस्टाग्राम) तसेच पत्रकारांच्या योजनांचे स्वतंत्र क्यूआर कोड सुद्धा निर्माण करण्यात आहे.  सदर क्यूआर कोड स्कॅन करताच माहिती उपलब्ध होते.
Chandrapur's New District Information Office inaugurated by the District Collector

#Chandrapur'sNewDistrictInformationoffice
#Chandrapur'snewDistrictInformationOfficeinauguratedbytheDistrictCollector 
#Diochandrapur