दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी, ब्लास्टमध्ये 08 लोकांचा मृत्य, 24 जण जखमी Major explosion near Delhi's Red Fort Metro station, high alert issued after car explodes, 08 people killed, 24 injured in blast

💥 दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, 

💥 कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी

💥 ब्लास्टमध्ये 08 लोकांचा मृत्य, 24 जण जखमी

#Loktantra Ki Awaaz
दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी एका कारमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला मेट्रो गेट क्रमांक १ जवळ हुंडई – I20 कारमध्ये हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.या स्फोटानंतर लोक जीव वाचवण्यासाठी पळाले. त्यामुळे सुरुवातीला लोकांना हा सिलींडर ब्लास्ट वाटला.

दिल्ली पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. सोमवारी सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर मोठा धमाका झाला. त्यानंतर एकच अफरातफरी माजली. लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली. कोणाला काय करावे हे समजत नव्हते. अखेर काय झाले हे कोणालाच कळत नव्हते. सुरुवातीला लोक सिलींडर ब्लास्ट समजत होते. परंतू जसजसा वेळ गेला तसतसे हा मोठा ब्लास्ट असल्याचे स्पष्ट झाले.
🔹 लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक – १ च्या जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये जोरदार धमाका झाला. धमाक्यानंतर आगीचे लोळ उठले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी आजूबाजूची अन्य तीन- चार वाहने देखील आली. हा ब्लास्ट सायंकाळी ६.५२ वाजता झाला.

🔹किती लोक जखमी झाले : आता पर्यंत या ब्लास्टमध्ये 08 लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना लोक नायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या स्ट्रीट लाईट्स देखील क्षतिग्रस्त झाल्या.

🔹दिल्लीत हाय अलर्ट जारी : सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस आणि फायरब्रिगेटची पथके घटनास्थळी पोहचले. NIAच्या पथकाने घटनास्थळी तपास सुरु केला असून फोरेन्सिक पथकांनी तपासणी सुरु केली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.

🔹अमित शाह यांनी घेतली माहिती : या संपूर्ण घटना क्रमाची माहिती दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलछा यांनी देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांना दिली. गृहमंत्रालयाने या घटनेवर नजर ठेवली आहे आणि तपासाचे आदेश दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली.

Major explosion near Delhi's Red Fort Metro station, high alert issued after car explodes, 08 people killed, 24 injured in blast 

#MajorexplosionnearDelhi'sRedForMetrostation 
#highalertissuedaftercarexplodes 
#08peoplekilled24injuredinblast 
#kalkilla 
#Redfort 
#newdelhiblast 
#blast 
#carblast 
#metrostationblast