जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांचा विदर्भ दौरा
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपुर : जय महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना द्वारा लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दि 23 फेब्रुवरी ते 27 फेब्रुवरी 3026 पर्यंत संप पुकारण्यात आला त्याची दखल घेऊन मंत्री स्तरीय बैठक पार पडली. पुढील काही दिवसात मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांचे सोबत बैठक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचे संघटन मजबूत करणे व संघटनेची पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून दिनांक २७ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांचा विदर्भ दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
तेव्हा खालील प्रमाणे बैठका ठरल्या आहेत.
१) परभणी येथून प्रस्थान व शुक्रवार रात्री अमरावती आगमन व मुक्काम शनिवारी दि. २८ मार्च २०२६ ला ११:३० वा. अमरावती येथे बैठक (अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ ची एकत्रित सहविचार सभा अमरावती येथेच होईल)
२) अमरावती येथून प्रस्थान शनिवारी रात्री वर्धा येथे आगमन व मुक्काम रविवारी दि.२९ मार्च २०२६, ११:३० वा. वर्धा बैठक
३) वर्धा येथून प्रस्थान व रविवारी रात्री भंडारा येथे आगमन व मुक्काम सोमवार दि. ३० मार्च २०२६ ला १०:०० वा भंडारा येथे बैठक आणि १:०० वाजता आर्णी प्रदीप मिश्रा महाराज प्रवचन लाभ व त्यानंतर नागपूर कडे प्रस्थान व रात्री मुक्काम दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागपूर येथे ११:३० वाजता बैठक व त्यानंतर दुपारी ३ :०० वाजता नागपूर कोल्हापूर ट्रेन ने परभणी परतीचा प्रवास. अशी माहिती सचिन भालेकर, राज्य कार्यकारणी सदस्य, सुरज चावरे, अमरावती जिल्हाध्यक्ष, विजयानंद तायडे यवतमाळ पालक अध्यक्ष, श्रीकृष्ण गावंडे यवतमाळ जिल्हाध्यक्ष विनय शिरसाठ, जिल्हाध्यक्ष, बुलढाणा आकाश गद्रे, जिल्हाध्यक्ष, व अमोल पालखेडे, अकोला ईश्वर तरडे, जिल्हाध्यक्ष व नितिन पालवे, वाशीम संदीप ठाकरे वर्धा, वर्धा जिल्हा पालक अध्यक्ष नितीन तराळे वर्धा, वर्धा जिल्हाध्यक्ष गणेश बागडे आरटीओ संघटना नागपूर, गणेश गेडेकर, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर मिलिंद धोंगडे जिल्हाध्यक्ष
नागपूर यांनी दिली आहे.
