शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती…आता पीक कर्ज मिळणार अगदी घरबसल्या…Digital revolution for farmers…now crop loans can be availed even from home…

📱शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती…

📱आता पीक कर्ज मिळणार अगदी घरबसल्या…

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘कृषी ३६०’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी आपण अत्याधुनिक डिजिटल पीक कर्ज प्रणालीचा दिमाखदार शुभारंभ मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे अत्यंत उत्साहात पार पाडला. या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमामुळे पारंपारिक कर्ज प्रक्रियेला फाटा मिळणार असून, आता पीक कर्ज प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या सेवा मिळतील आणि त्यांचा वेळ व श्रम दोन्हींची बचत होईल. या सुवर्णक्षणी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बँकेच्या माहितीपूर्ण नियमावली पुस्तिकेचे तसेच बँकेच्या अत्याधुनिक नवीन संकेतस्थळाचे (Website) अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे बँकेच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात ग्राहकांसाठी अधिक सुलभ होतील.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. डी. सी. सी. बैंक चे अध्यक्ष रविन्द्र शिंदे होते, ते अध्यक्षस्थानी राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा योग त्यांना मिळाला आहे अशे ते आपल्या भाषन्त बोलले. कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (चंद्रपूर) जयसिंग ठाकूर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझले, बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेश खान पठाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष नोंद: माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत ह्या या निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण कामामुळे, तसेच प्रविण वानखेडे ( विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर) हे न्यायालयीन कामात व्यस्त असल्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यांनी आपली चित्रफित (Video Message) पाठवून बँकेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यासोबतच बँकेच्या संचालक मंडळातील यशवंत दिघोरे, गणेश तर्वेकर, रोहित बोम्मावार, जयंत टेमुर्डे, गजानन पाथोडे, ललित मोटघरे, सुदर्शन निमकर, दामोधर मिसार,  उल्हास कर्पे, विजय बावणे, अनिल वाढई, विलास मोगरकर, दिनेश चोखारे, निशिकांत बोरकर व सौ. नंदा अल्लुरवार यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.
या सोहळ्याला बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी राजाच्या आर्थिक व डिजिटल सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध राहील, हीच बैंकची भूमिका आहे.

#DigitalRevolutionforfarmers 
#nowcropLoanscanbeavailedevenfromhome 
#ChandrapurCDCCBANK 
#CDCCBank 

Digital revolution for farmers…now crop loans can be availed even from home…