🔶 चंद्रपूर जिल्हा पुन्हा हादरला : गुंजेवाहीत चार महिलांना वाघाने ठार केले
#Loktantra Ki Awaaz
सिंदेवाही : गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने भीषण हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून ग्रामीण भागात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉🏻 मृतकात
१) सुनीता कौशिक मोहुरले (३५)
२) संगीता संतोष चौधरी (४०)
३) अनीता दादाजी मोहुरले (४५)
४) कविता दादाजी मोहुरले (४८)
यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मानव-व्याघ्र संघर्षाने भीषण स्वरूप धारण केले आहे. वाघांचे वाढते हल्ले, ग्रामीण भागातील दहशत, शेतकऱ्यांवरील संकट आणि जंगलालगतच्या गावांमध्ये निर्माण झालेली भीती — या सर्व प्रश्नांवर शासन व वन विभागाकडून केवळ बैठका आणि घोषणाच होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
Human-tiger conflict turns deadly, Chandrapur district shaken again: Tiger kills four women in Gunjewahi
#Human-tigerconflictTurnsdeadly #ChandrapurdistrictShakenAgain #TigerkillsfourwomeninGunjewahi
#Tiger
#
