🔹शिक्षकावर गुन्हा दाखल
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 15 मे : भद्रावती तालुक्यातील नवीन चिचोर्डी जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक धनराज विठ्ठल मगरे यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून मतदान केंद्र क्र. 299 मधील मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) च्या कामाकरीता नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी निवडणुकीसारख्या अति महत्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआआर चे काम जानेवारी 2026 पासून सुरू आहे. परंतु मतदान केंद्रस्तरीय अधिकारी धनराज मगरे, हे मतदार यादी संबंधातील महत्वाची कामे करीत नसल्यामुळे त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. परंतु त्यांच्या एसआयआर च्या कामामध्ये कोणतीही प्रगती दिसून आली नाही. मगरे यांना वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही त्यांनी कामात टाळाटाळ केली. तसेच मागील एक महिन्यांपासून 35 टक्केच्या वर काम केलेले नाही. एसआयआर च्या अंत्यत महत्त्वाचे कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
26 एप्रिल पासून 12 मे 2026 पर्यंत एसआयआर कामाचा आढावा घेतला असता त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा आढळून आली नाही. लेखी नोटीस देऊनसुध्दा श्री. मगरे हे कामाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे निवडणूकीसारख्या अति महत्वाच्या कामामध्ये कामचुकारपणा केल्याचे सिध्द होत असल्यामुळे त्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32 व म.ना.से. (शिस्त व अपिल) अधिनियम 1979 अन्वये कर्तव्यात कसूर केल्यामुळे धनराज मगरे, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यास उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पर्यवेक्षक कोमल जोशी यांनी 14 मे 2026 रोजी भद्रावती पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
Laziness in SIR work; Case registered against teacher
#SIR
#LazinessinSIRworkCaseregisteredagainstteacher
