"छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार" – आ. सुधीर मुनगंटीवार🚩 दुर्गापूरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवविचार, समाजएकता आणि स्वराज्याचा संदेश; शिवसेवा हीच आयुष्यभराची साधना असल्याची भावना व्यक्त "Chhatrapati Shivaji Maharaj is the supreme thought of self-respect, patriotism and welfare of the people" – MLA Sudhir Mungantiwar, The message of Shivaji's thought, social unity and Swarajya was conveyed at the Shivarajyabhishek ceremony in Durgapur; The feeling that Shiva service is the practice of a lifetime is expressed

🚩 "छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार" – आ. सुधीर मुनगंटीवार

🚩 दुर्गापूरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवविचार, समाजएकता आणि स्वराज्याचा संदेश; शिवसेवा हीच आयुष्यभराची साधना असल्याची भावना व्यक्त

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर: तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दुर्गापूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत शिवविचारांचा जागर करण्याचे आवाहन केले. "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पराक्रमी राजा नसून स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, नीतिमत्ता आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार आहेत," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण होते. जगात अनेक राजे झाले, मात्र रयतेसाठी राज्य करणारे एकमेव लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
👉🏻 शिवसेवा हेच जीवनातील सर्वोच्च भाग्य
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेची संधी मिळणे हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्य आहे," असे भावनिक उद्गार काढत मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून शिवचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविलेल्या विविध ऐतिहासिक उपक्रमांची माहिती दिली. शिवकार्य हे पदापुरते मर्यादित नसून आयुष्यभराची साधना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
👉🏻 शिवकार्याला दिली नवी दिशा
प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविणे, लंडनमधून शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे भारतात आणण्याचा पुढाकार, रायगडासाठी चांदीची पालखी, भवानी मातेला चांदीचे छत्र, सहस्त्रजलकलश यात्रा, गेटवे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, राज्याभिषेक वर्षाचा विशेष लोगो, मंत्रालयातील 'शिवविचार' उपक्रम, 'जाणता राजा' महानाट्य, शिवकालीन होन आणि विशेष टपाल तिकिटांचे प्रकाशन अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
👉🏻 'जय भवानी... जय शिवाजी'चा जयघोष
आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये, जिथे औरंगजेबाने शिवरायांचा अपमान केला होता, त्याच ठिकाणी आज शिवजयंती उत्सव साजरा होत असून "जय भवानी... जय शिवाजी"चा जयघोष घुमत असल्याचा उल्लेख करत त्यांनी समाधान व्यक्त केले.
👉🏻 समाजएकता आणि विकासाचा संकल्प करण्याचे आवाहन
दुर्गापूर येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा उल्लेख करत त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच परिसरातील आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणून लोककल्याणकारी स्वराज्य उभे केले, त्याच विचारांनी समाजात एकात्मता, स्वाभिमान आणि विकासाचा संकल्प करूया, असे आवाहन करत शिवविचारांचा प्रसार करणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी आपण कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी श्रीनिवास जंगमवार, हनुमान काकडे, रुद्रनारायण तिवारी, मनोज सिंघवी, नामदेव आसुटकर, शांताराम चौखे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 "Chhatrapati Shivaji Maharaj is the supreme thought of self-respect, patriotism and welfare of the people" – MLA Sudhir Mungantiwar, The message of Shivaji's thought, social unity and Swarajya was conveyed at the Shivarajyabhishek ceremony in Durgapur; The feeling that Shiva service is the practice of a lifetime is expressed 

 #ChhatrapatiShivajiMaharaj #supremethoughtof self-respect #ChhatrapatiShivajiMaharaj  #MLASudhirMungantiwar 
#Socialunity 
#Swarajya  
#ChhatrapatiShivarajyabhishekceremonyDurgapur