बालिकेबाबत पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन Parents urged to contact regarding child


बालिकेबाबत पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

#Loktantra Ki Awaaz 

चंद्रपूर, दि. 30 जुन : बेकायदेशोर दत्तक प्रकरणातील बालिका ही एक महिन्याची असताना तिला चाइल्ड हेल्पलाइन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी बालकल्याण समिती, चंद्रपूर यांच्यासमोर उपस्थित केले. सदर बालिका बाल कल्याण समितीच्या आदेशाने किलबिल विशेष दत्तक संस्था, चंद्रपुर येथे दाखल आहे.

सदर बालिका सध्या अंदाजे 17 महिन्याची असून उंची 80 सेमी. रंग काळा - सावळा आहे. चेहऱ्याचा आकार गोल, केस काळे, कपाळ उंच आहे. तिचे नाक थोडे मोठे आहे. तरी बालिकेच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बाल कल्याण समिती चंद्रपुर द्वारा शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, शास्त्रीनगर, मूल रोड, चंद्रपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपुर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा स्टेडियमजवळ चंद्रपुर किंवा किलबिल विशेष दत्तक संस्था, डॉक्टर मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर, चंद्रपुर या पत्त्यावर संपर्क साधून सदर बालिका बाबत आपला हक्क दाखवावा.

अन्यथा बाल कल्याण समिती चंद्रपूर या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करेल व किलबिल विशेष दत्तक संस्था दत्तक देण्याची प्रक्रिया करेल याची संबंधितांना नोद घ्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास कार्यालय चंद्रपुरने कळविले आहे.

Parents urged to contact regarding child 

#Parentsurgedtocontactregardingchild 

#ChandrapurParentsurgedtocontactregardingchild 

#ChandrapurChild