चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषदेत भाजपा चे अरुण लखानींचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा Path Cleared for BJP's Arun Lakhani to Win Unopposed in the Chandrapur-Gadchiroli-Wardha Legislative Council Constituency.

🔶 चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषदेत भाजपा चे अरुण लखानींचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा 

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर, 4 जून : विधान परिषद निवडणूक चंद्रपुर - गडचिरोली - वर्धा कांग्रेस उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. 

कॉंग्रेस पक्षांतर्गत गटबाजी, संख्याबळाचा अभाव आणि काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यासह अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्याने भाजपाचे अरुण लखानी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात मतदानाची गरज उरली नाही. परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी अरुण लखानी यांना बिनविरोध विजयी घोषित केले.

अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.