सीडीसीसी बँकेला 36 हजार 757 शेतक-यांची यादी प्राप्त, कर्जमाफीची थकीत रक्कम 276 कोटी 71 लक्ष, बँकेच्या शाखा, सहकारी संस्था व गावपातळीवर याद्या प्रसिध्द CDCC Bank has received a list of 36,757 farmers, the outstanding loan waiver amount is Rs 276.71 crore, the lists are published at the bank's branches, cooperative societies and village level

🔶 सीडीसीसी बँकेला 36 हजार 757 शेतक-यांची यादी प्राप्त
                                
🔶 कर्जमाफीची थकीत रक्कम 276 कोटी 71 लक्ष

🔶 बँकेच्या शाखा, सहकारी संस्था व गावपातळीवर याद्या प्रसिध्द

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, दि. 25 जुलै : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यातील 36 हजार 757 शेतक-यांची यादी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) शुक्रवारी रात्री प्राप्त झाली. सदर शेतक-यांची कर्जमाफीची थकीत रक्कम 276 कोटी 71 लक्ष रुपये आहे. 

राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे. राज्यातील सुमारे 56 लाख शेतक-यांना याचा लाभ मिळणार असून कर्जमाफीची एकूण रक्कम 36 हजार 500 कोटी आहे. कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित असल्याने बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला गेला. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्र 43 हजार 816 खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शुक्रवारी रात्री प्राप्त झाल्या. सदर याद्या शाखा स्तरावर व संस्था स्तरावर तसेच गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

चंद्रपुर जिल्हा परिषद समोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शनिवारी (दि.25) पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहाकारी संस्था) जयसिंग ठाकूर, सीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्र. व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी आर.पी. दरवे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी श्री. सरपाते, श्री. तुपट, श्री. कुमरे, शाखा सचिव किशोर लोनगाडगे, चांदा सेवा संस्थाचे सचिव प्रमोद मते, बँकेचे अधिकारी मुकेश मते आदी उपस्थित होते. 

🔶 शेतकऱ्यांना आवाहन : योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह 'आपले सरकार सेवा केंद्रात' किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक व  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

CDCC Bank has received a list of 36,757 farmers, the outstanding loan waiver amount is Rs 276.71 crore, the lists are published at the bank's branches, cooperative societies and village level 

#CDCCBankhasreceivedalistof36,757farmers 
#theoutstandingloanwaiveramountisRs276.71crore 
#thelistsarepublishedatthebank'sbranchescooperativesocietiesandvillagelevel 
#MaharashtraFarmer 
#CDCCBank 
https://aurenceperfumes.in