वनपाल, वनरक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात; चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ACB Forester, forest guard and private person caught in ACB's net; Chandrapur Anti-Corruption Department takes action

💥 वनपाल, वनरक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात; 

💥 चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

💥 २० हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

भद्रावती : भद्रावती येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयातील वनपाल व वनरक्षक यांनी अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूरच्या पथकाने रविवारी (दि. २७ जुलै) धडक कारवाई केली. या प्रकरणात दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांसह लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत घरबांधणीसाठी रेती वाहतूक केली जात असताना ७ जुलै रोजी रात्री वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत (वय ४२) व वनरक्षक संदीप पुंडलिक पारखे (वय ३९) यांनी ट्रॅक्टर अडवून वनक्षेत्र सहायक कार्यालय, भद्रावती येथे नेले. त्यानंतर अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २७ जुलै रोजी एसीबीने सापळा रचला. त्यावेळी आरोपींनी खासगी इसम ललित दिलीप नागपूरे (रा. भद्रावती) याच्या माध्यमातून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच एसीबी चंद्रपूरच्या सापळा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एजंटामार्फत कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Forester, forest guard and private person caught in ACB's net; Chandrapur Anti-Corruption Department takes action 

#Foresterforestguardandprivatepersoncaugh tinACB'snet

#ChandrapurAnti-CorruptionDepartmenttakesaction

#AcB 

#ACBChandrapur