भेसळयुक्त अन्न व बनावट औषधांविरोधात AI-आधारित तक्रार प्रणाली सुरू, मराठीत बोलूनही करता येणार तक्रार AI-based complaint system launched against adulterated food and fake medicines, complaint can be made even by speaking in Marathi


🔶 भेसळयुक्त अन्न व बनावट औषधांविरोधात AI-आधारित तक्रार प्रणाली सुरू

🔶 मराठीत बोलूनही करता येणार तक्रार

#Loktantra Ki Awaaz 
मुंबई : भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत नागरिकांना तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने AI-आधारित आधुनिक तक्रार नोंदणी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या व्यासपीठावर नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली समस्या बोलून सांगू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संबंधित तक्रार स्पष्ट, सुसंगत व आवश्यक मुद्द्यांसह आपोआप तयार केली जाते. त्यानंतर नागरिक एका क्लिकवर तक्रार सादर करू शकतात.

अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारींसाठी एकाच व्यासपीठाचा वापर करता येणार असून, तक्रार दाखल केल्यानंतर तिची सद्यस्थिती (Status) देखील ऑनलाइन ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांविषयी माहिती मिळाल्यास तत्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.

👉🏻 तक्रार नोंदविण्यासाठी संकेतस्थळ :
https://complaints.mahafda.in⁠
"तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा" या संदेशासह नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाने केले आहे.

AI-based complaint system launched against adulterated food and fake medicines, complaint can be made even by speaking in Marathi 

#AI-basedcomplaintsystemlaunchedagainstadulteratedfoodandfakemedicines#complaintcanbemadeevenbyspeakinginMarathi 
#FDA 
#TukaramMunde