महावितरणच्या सहायक अभियंता लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, सोलर कनेक्शनसाठी रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी, आरोपी ताब्यात Assistant Engineer of Mahavitaran caught by ACB while accepting bribe, demanded bribe in return for issuing release order for solar connection, accused in custody

💥 महावितरणच्या सहायक अभियंता लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

💡सोलर कनेक्शनसाठी रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी

🔵 आरोपी ताब्यात

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, 01 जुलै : प्रधानमंत्री  सूर्यघर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या दोन सोलर सिस्टीमना महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यास आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारणाऱ्या सिंदेवाही येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चंद्रपूरच्या पथकाने आज बुधवारी, 1 जुलै रोजी रंगेहाथ पकडले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अमोद संतोष रंदये (वय ३८), सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग कार्यालय, सिंदेवाही यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यास आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये, अशी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान आरोपी अमोद रंदये यांनी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक व श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहुरपवार, सचिन गजभिये, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम आणि संदीप कौरासे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या एजंटकडून शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी, चंद्रपूरने केले आहे.
Assistant Engineer of Mahavitaran caught by ACB while accepting bribe, 

demanded bribe in return for issuing release order for solar connection, 

accused in custody

#AssistantEngineerofMahavitarancaughtbyACBwhileacceptingbribe #demandedbribeinretureforissuingreleaseorderForsolarconnection #accusedincustody 
#ACBChandrapur 
#ACBChandrapurMahavitran 
#MahavitranChandrapurACBSolar