📌 1 जुलैपासून कारवाई सुरू
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 3 जुलै : केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP - High Security Registration Plate) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने 23 डिसेंबर 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवरही HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात HSRP बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 होती. आता 1 जुलै 2026 पासून या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहनांवर HSRP बसविण्यात आलेली नाही, अशा वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मात्र, ज्या वाहनधारकांनी HSRP बसविण्यासाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांना अंमलबजावणीदरम्यान सवलत देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सर्व वाहनमालकांना आवाहन केले आहे की, आपल्या वाहनांवर तातडीने HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर (RTO ) तसेच वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
वाहनधारकांनी अनावश्यक दंड टाळण्यासाठी लवकरात लवकर HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
All vehicles to be required to have HSRP number plates
Action to begin from July 1
#AllvehiclestoberequiredtohaveHSRPnumberplates
#ActiontobeginFromJuly
#RTO
#HSRP
#HSRPPlate
#RTOChandrapur
