मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीचा मार्ग उतरोत्तर प्रशस्त करावा- हंसराज अहीर Hundreds of meritorious students felicitated in a grand ceremony in Chandrapur on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday; students should continue to pave the way for their academic progress—Hansraj Ahir.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीचा मार्ग उतरोत्तर प्रशस्त करावा- हंसराज अहीर

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, 23 जुलै :  गुणवंतांचा सन्मान करणे ही भारतीय संस्कृती असून अशा सन्मानातून संस्कारक्षम व कर्तृत्ववान भावी पिढी घडत असते. आजचा गुणवंत सन्मान सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सारख्या कर्तृत्वशाली राजनेत्याच्या वाढदिवसाला समर्पित असल्याने विशेष आनंद होतो. त्यांच्या नेतृत्वात शिक्षण, कौशल्यविकास आणि युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीचा मार्ग उतरोत्तर प्रशस्त करावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

भाजपा, भाजयुमो व ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी/12वी च्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा दि. 22 जुलै 2026 रोजी तुकूम चंद्रपूर येथील महेश भवन सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगिता खांडेकर, भाजप नेते खुशाल बोंडे, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा डॉ. अशोक जिवतोडे, माजी कुलगूरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम.जे. खान, एमआयडीसी असो. अध्यक्ष मधुसूदन रूंगटा, उद्योजक रामकिशोर सारडा, युवा नेते रघुवीर अहीर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, तुषार सोम, भाजप नेते प्रकाश देवतळे, शामल अहीर, विनोद शेरकी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात अहीर म्हणाले की, आजचा विद्यार्थी उद्याचा राष्ट्रनिर्माता आहे. त्यामुळे हा सन्मान देशाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात केवळ गुणांसाठी नव्हे तर, उत्तम संस्कार, चारित्र्य आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासून समाजापूढे आदर्श ठेवावा. त्यांनी याप्रसंगी पालकवृंद व शिक्षकांचेही अभिनंदन केले.

याप्रसंगी आपल्या मनोगतात आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना अविश्रांत परिश्रम करण्याचा सल्ला देत, सातत्य, चिकाटी व समर्पण हेच यशाचा खरा मार्ग असल्याचे सांगितले. चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्ञानार्जनासाठी आपण कटीबध्द असून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी आपण सदैव प्रयत्नरत राहू असा विश्वास देत त्यांनी या सन्मान सोहळ्यातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी आपल्या भावी स्वप्नांच्या पुर्ततेकरिता प्रयत्नशील राहावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजक रघुवीर अहीर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून 10वी व 12वी हे वर्ष विद्यार्थ्यांचा पाया असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात आपले नांव उज्ज्वल करण्याकरिता यशाचे सातत्य कायम ठेवून आपले भवितव्य घडवावे व भक्कम राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्याकरिता स्वतःला सिध्द करावे असे विचार व्यक्त केले. 
यावेळी खुषाल बोंडे, डॉ. अशोक जिवतोडे, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, मधुसूदन रूंगटा, डॉ. एम.जे. खान यांनीही विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर अतिथींनी 10वी व 12वीच्या शेकडो विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तु देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमास रवींद्र गुरनुले, संजय गुरघाटे, अरूण तिखे, पुष्पाताई उराडे, देवानंद वाढई, सरला कुळसंगे, अॅड. सारीकाताई संदूरकर, शितलताई गुरनुले, मोहन चौधरी, शाम कनकम, सविताताई दंडारे, प्रा. रवि जोगी, प्रदीप किरमे, सुभाष आदमने, स्वप्नील डुकरे, विकास खटी, राजू येले, संजय खनके, प्रवीण गिलबिले, दिवाकर पुध्दटवार, पूनम तिवारी, गौतम यादव, सुदामा यादव, ऋतुजाताई नागपुरे, मयुर भोकरे, जगदीश दंडेले, कमल कजलीवाले, पवन पुरेल्ली, सुबोध चिकटे, तुषार मोहुर्ले यांचेसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पालकवृंद मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल बनकर यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. सारीका संदूरकर यांनी केले.

Hundreds of meritorious students felicitated in a grand ceremony in Chandrapur on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday; students should continue to pave the way for their academic progress—Hansraj Ahir.

#StudentFelicitated 
#ChandrapurStudentFelicitated 
aurenceperfumes.in