💥 मतदार यादीच्या कामात निष्काळजीपणा
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 20 जुलै : मतदार यादीची तयारी, पुनरावलोकन, दुरुस्ती तसेच नियमानुसार मतदारांची नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे या अधिकृत कर्तव्यात हयगय, टाळाटाळ आणि निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने चंद्रपुरातील दोन शिक्षकांसह तीन कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.
मुरलीधर बागला हायस्कूल, चंद्रपूर येथील सहायक शिक्षक आर.बी. येसांबरे, चंद्रपूर मनपा शाळेतील सहायक शिक्षक आनंद गेडाम यांच्यासह चंद्रपूर वेकोली क्षेत्रीय मुख्यालयातील सोनू ढुमणे, किरण रामटेके आणि मनोज शेंडे या तीन कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 13(AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4(1) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही कारवाई केली आहे. मतदार यादीशी संबंधित निवडणूक विषयक अधिकृत कर्तव्य पार पाडताना झालेल्या गंभीर निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर ही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 मधील नियम 16 नुसार निलंबनाच्या कालावधीत सहा. शिक्षक श्री. येसांबरे, सहा. शिक्षक आनंद गेडाम, वेकोलीचे कर्मचारी सोनू ढुमणे, किरण रामटेके आणि मनोज शेंडे यांना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यवसाय करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध गैरवर्तनाची कारवाई करण्यात येईल. तसेच अशा परिस्थितीत त्यांना निर्वाह भत्त्याचाही लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Three employees including two teachers suspended in Chandrapur, Negligence in voter list work
#ThreeemployeesincludingtwoteacherssuspendedinChandrapur #Negligenceinvoterlistwork
#VoterList
#Teacher
#SIRChandrapurTeacher
