मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला 100 दिवस पूर्ण

मुंबई 11 मार्च : शासनाच्या १०० दिवसातील निर्णय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विधानभवन येथे झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी यावेळी उपस्थित होते.