अन्य शहरातून चंद्रपुर मध्ये दाखल झालेल्या नागरिकांनी 14 दिवस घरातच राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपुर ,18 मार्च (जिमाका):-
✨ आजपासून रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर मनपा सुरु करणार कसून चौकशी
✨ चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ इंग्लंड वरून आलेल्या चार नागरिकांना घरीच देखरेखीखाली ठेवले
✨ जिल्ह्यामध्ये आता एकूण 12 विदेशी नागरिक देखरेखीखाली
✨ पुण्यावरून शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी घरीच थांबण्याचे निर्देश
✨०७१७२-२७०६६९ क्रमांकाचा मार्गदर्शनासाठी लाभ घेण्याचे आवाहन
✨ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने केवळ ११ ते ६ सुरू ठेवण्याचे आवाहन
✨ ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या खासगी बसेसला आरटीओकडून नोटीस
✨ पाच मजुरांपेक्षा अधिक एकत्रित येणाऱ्या कामांवर निर्बंध
✨ रेल्वेस्थानकाला थर्मल डिटेक्टर लावण्याचे निर्देश
✨ 31 मार्चपर्यंत लग्न असल्यास घरगुती पद्धतीने करण्याचे आवाहन
✨ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास घ्यावयाच्या काळजी संदर्भात कार्यशाळा
✨ मनपा आयुक्त मार्फत चंद्रपूर शहरातील व्यापारी उद्योजकांचे सोबत चर्चा
✨ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन