पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश, 21 मार्च 2020 ला पूणे - बल्लारशाह विशेष ट्रेन धावणार

 चंद्रपूर, 20 मार्च (का.प्र.) :  संपूर्ण जगात कोरोना आजाराने थैमान घातले असतांना या आजाराने भारतातही शिरकाव केलेला आहे . महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अल्प रूग्ण आढळले आहे . पूणे येथेसुध्दा कोरोना विषाणुचे रूग्ण आढळले असतांना पूर्वतयारी म्हणुन संपूर्ण शाळा महाविद्यालये बंद करण्यात आल्यामुळे शिक्षणाकरीता किवा नौकरीकरीता पूणे येथे वास्त्व्यास असलेले मुले मुली आपल्या घरी परत येत आहे हे लक्षात घेवून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्यासोबत दुरध्वनी व्दारे चर्चा करूण पत्राव्दारे पूणे - बल्लारशाह ' विशेष गाडी सुरू करण्याची विनंती केली होती . त्यानुसार मध्य रेल्वे ने पूणे - बल्लारशाहे स्पेशल ( One Way ) गाडीची घोषना केली आहे . गाडी नं . 01071 ही पूणे येथून 21 मार्च 2020 ला सायं . 17 . 30 वाजता सुटनार असुन चंद्रपूर येथे 22 मार्च 2020 ला दु . 14 . 03 वा . तर बल्लारशाह येथे 15 . 00 वा पोहवनार आहे . ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने सदर गाडी सुरू झाल्याने चंद्रपुर रेल्वे संघर्ष समिती व्दारा मा . हंसराज अहीर यांचे आभार मानले व अभिनंदन केले . 
21 मार्च 2020 ला ही गाडी पूणे येथून 17 . 30 वा . निघणार असून लोणावळा 18 . 43 वा , - कल्यान 20 . 20 वा . - वसई रोड 21 . 50 वा . - पालघर 22 . 32 वा . – वापी 00 . 01 वा . नवसारी 00 . 50 वा . - भेस्तान 01 . 05 वा . - चलथान 01 . 35 वा - नंदुरबार 02 . 45 वा - अमलनेर 04 . 45 वा . - धरनगांव 05 . 10 वा . - जळगांव 05 . 55 वा . - भुसावळ 06 . 20 वा . - मल्कापूर 07 . 07 वा . - शेगांव 08 . 45 वा . - अकोला 08 . 40 वा . - बडनेरा 11 . 00 वा . - धामनगांव 11 . 18 वा . - वर्धा 12 . 20 वा . - हिंगनघाट 12 . 28 वा . - चंद्रपूर 14 . 03 वा . - बल्लारशाह 15 . 00 वा या मार्गाने ही गाडी 22 मार्च 2020 ला बल्लारशाह येथे पोहोचनार आहे . रेल्वे संघर्ष समिती सदस्य श्री दामोदर मंत्री ( ZZZRUCC Member ) , श्री रमनीक भई चौहान , श्री रमाकांत देवडा , श्री महावीर मंत्री , डॉ श्री . भुपेश भलमे , श्री राजकुमार लेखवानी , श्री जगदीश जाधवनी , श्री अशोक रोहरा , श्री नरेंद्र सानी , श्री . सुनील लाहोटी , श्री राजेश सादरानी , श्री अनीश दिक्षीत , श्री दिनेश बजाज , श्री प्रभाकर मंत्री , श्री सेजय जावडे , श्री बी . एन बिश्वास , श्री सुरेंद्र गांधी , श्री रमेश बोथरा , श्री पूनम तिवारी , श्री रवि कार्या , श्री जॉर्ज कुटी , श्री जॉन साजी , श्री पी सी राजू , श्री राजकुमार पाठक , श्री योगेश भंडारी , श्री सुनील भटटळ , श्री लक्ष्मन चौधरी , डॉ . श्री गुलवाडे , श्री सदानंद खत्री , श्री प्रदीप महेश्वरी , श्री दिपक सोमानी , श्री देवेंद्र हिंगोराणी यांनी प्रवाशांनी या गाडीचा लाभ ध्यावा असे आव्हान केले.