औरंगाबाद विभागीय लोकशाही दिनी सहा अर्जांवर सुनावणी


औरंगाबाद,दि. 09 (विमाका) :- येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात  सहा अर्ज दाखल झाले. या अर्जावर सुनावणी करण्यात आली.
मागील प्रलंबित अर्जांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ही प्रकरणे तसेच आज सुनावणी घेण्यात आलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना संबंधितांना उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी दिले. 
 मुख्य अभियंता जलसंपदा विभागाचे एम.आर गायकवाड, उपसंचालक भुमि अभिलेख कार्यालयाचे डॉ. प.ल.साळवे, समाज कल्याण विभागाचे उपआयुक्त शेख जलील, जिल्हा महिला बाल विकासचे अशोक शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी स.ज.सदागते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता रेणुकादास चौधरी, भूमी अभिलेखचे उपसंचालक संजल ढिकले, वनसंरक्षक कार्यालय सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजाजन दागले, विभागीय कृषी सहसंचालक सा.को.दिवेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.