चंद्रपूर, दि.30 मार्च (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील नागरिक घराबाहेर निघू नयेत व त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता देखील पडू नये अशा दोन्ही बाजूला प्रशासन तयारी करत आहे अशावेळी संपर्काचे साधन म्हणून जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकाची नोंद प्रत्येक घराघरात घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या काळात नागरिकांना अनेक प्रश्न पडतात. घरा बाहेर कोणी पडावे व पडू नये, यापासून तर आवश्यक सुविधा व आरोग्यविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर विविध हेल्पलाइन जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. याशिवाय हॅलो चांदा देखील यंत्रणा सुरू झाली आहे . या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांनी प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना क्वॉरेन्टाईन संदर्भात तक्रार, अडचणी, माहिती इत्यादीसाठी तसेच उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, ॲम्बुलन्स, रुग्णांची, प्रवाशांची,अन्नधान्य व सामान्य चौकशीसाठी, कम्युनिटी किचन,जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, सामान्य चौकशी, कायदा-सुव्यवस्था वाहतूक इत्यादी संदर्भात तक्रार व मदतीसाठी अधिकृत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहे.
क्वॉरेन्टाईन संदर्भात तक्रार, अडचणी, माहिती इत्यादीसाठी नियंत्रण कक्ष एकात्मिक रोग संरक्षण प्रकल्प यांना 07172-253275,07127-261226 या क्रमांकावर, उपचार,समुपदेशन, पाठपुरावा,ॲम्बुलन्स इत्यादी माहितीसाठी नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय येथे 07172-270669 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे रुग्णांची, प्रवाशांची, अन्नधान्य व सामान्य चौकशीसाठी 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकता.
चंद्रपूर महानगरपालिका कक्षांतर्गत कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, सामान्य चौकशी इत्यादी माहितीसाठी 07172-254614 तसेच
कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, संचारबंदी इत्यादी संदर्भात तक्रार, मदतीसाठी 07172-273258,07172-263100 या पोलीस नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करावा.
जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना काढण्यासाठी 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
तालुकास्तरीय कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्षाला मदतीसाठी संपर्क करू शकता यामध्ये, चंद्रपुर 07172-250206, बल्लारपुर 07172-241391, राजुरा 07173-222131, भद्रावती 07175-265080, वरोरा 07176-282110, मुल 07174-220310, सावली 07174-274412, गो़डपिपरी 9119526147, पोंभुर्णा 07171-295999,9922242938, सिंदेवाही 07178-288245, चिमुर 07170-265547, नागभिड 07179-240050, ब्रम्हपुरी 07177-272073, कोरपना 07173-236658, जिवती 07173-295700 या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर मदत व चौकशीसाठी संपर्क करू शकता.