कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द- शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषदेत घोषणा


मुंबई, 20 मार्च (का. प्र.) :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषदेत घोषणा. 

 बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील शासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात  येणार

 इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या उर्वरित विषयांच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार. इयत्ता दहावीचे दोन पेपर नियोजित वेळेप्रमाणे येत्या शनिवारी आणि सोमवारी वेळापत्रकानुसार होणार. 

दहावीच्या परीक्षेसंबधित आवश्यकता असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरीहून काम करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी आणि शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन