नागरिकांनी गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहनमुंबई 7 मार्च (का. प्र.) :राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात होणारी गर्दी टाळण्याचे आवाहनदेखील नागरिकांना करण्यात येत आहे. सध्या राज्यात निरीक्षणाखाली १५ जण आहेत. २३० जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.