महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. कुणाल खेमनार


चंद्रपूर (का. प्र.)दि मार्च: जागतिक महिला दिन दिनांक मार्च रोजी सर्व जगामध्ये साजरा करण्यात येतो. या महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय येथील बचत साफल्य भवन येथे जागतिक महिला दिन व आरोग्य तपासणी शिबिर दिनांक मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या शिबिरांमध्ये कॅन्सर केअर फाउंडेशन टाटा ट्रस्ट च्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांची कॅन्सर तपासणी सुद्धा करण्यात आली.

आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला काम करीत आहे. परंतु नोकरीव्यवसाय व कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी  निभावताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी केले व जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजुरा योगेश कुंभेजकर,   उपजिल्हाधिकारी रोहयो पल्लवी घाटगेउपजिल्हाधिकारी भूसंपादन प्रियंका पवारतहसीलदार सामान्य संजय राईंचवारजिल्हा प्रकल्प व्यवस्थापक चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन टाटा ट्रस्ट सुमित पांडेजिल्हा प्रकल्प समन्वयक सुरज साळुंखेजिल्हा प्रकल्प समन्वयक (तंबाखू नियंत्रण)आशिष सुपासेडॉ. तुषार रामटेके( दंत चिकित्सा)तसेच जिल्हाधिकारी  कार्यालयाचे महिला अधिकारीकर्मचारी व चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन टाटा ट्रस्ट ची  टीम प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिरामध्ये प्रास्ताविक करीतांनाउपजिल्हाधिकारी भूसंपादन प्रियंका पवार यांनीशिबीराची रूपरेषा सांगितली तसेच  महिला कुटुंबातील सर्व कामे जबाबदारीने पार पाडीत असतात. आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे आहेत. असेही त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केले.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन टाटा ट्रस्टचे सुमित पांडे यांनी मार्गदर्शनात कॅन्सर विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले कीवर्षातून निदान एक वेळेस तरी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. महिलांमध्ये ब्रेस्ट आणि सर्विकल  या दोन प्रकारचे कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येते. यापासून बचाव व्हावे यासाठी  कोणतेही व्यसन करू नये.  तसेच कॅन्सरचे लक्षणे यावेळी सांगितलेजर कॅन्सर चे लक्षणे आढळले तर जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भेट द्यावी व वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जागतिक महिला दिन व आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.

या शिबिराचे सुत्रसंचालन माधुरी संतोषवार तर आभार प्रदर्शन  तहसीलदार सामान्य संजय राईंचवार यांनी के