तारापूरला नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदत - उद्योगमंत्री सुभाष देसाई


मुंबई 9 मार्च (का.प्र.)
तारापूर येथील 600 उद्योगांना तात्पुरता दिलासा

तारापूर येथील नवीन सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तारापूर येथील प्रतिदिन 25 दशलक्ष लिटर क्षमतेच्या  सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 6 मार्च 2020 रोजी सदरचे  सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. हे प्रक्रिया केंद्र बंद झाले असते तर सुमारे 600 उद्योगांना त्याचा फटका बसला असता. तसेच हजारो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती.