न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन


मुंबई 7 मार्च (का. प्र.):
न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या संचालिका लॉरेन मार्कल यांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी  संचालिका  (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान,नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.