जागतिक चिमणी दीना निमित्त "सेल्फी विथ खाऊ -प्याऊ ".- आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागाचा अभिनव उपक्रम.-चिमण्यांना वाचवणे व वाढविण्याकरीता विध्यार्थीचा प्रयत्न.

जागतिक चिमणी दीना निमित्त
 "सेल्फी विथ खाऊ -प्याऊ ".
- आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागाचा अभिनव उपक्रम.
-चिमण्यांना वाचवणे व वाढविण्याकरीता विध्यार्थीचा प्रयत्न.

चंद्रपुर/ राजुरा, 20 मार्च (प्रतिनिधि):
 बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या संकल्पनेनूसार व राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थीनी " जागतिक चिमणी दिन " नीमीत्य पक्षांना पिण्याकरीता  पाणी व दान्यान्ची व्यवस्था केली. आपल्या राहत्या घरी किंवा परिसरात हे पक्षांचे खाऊ -प्याऊ तयार करून लावण्यात आले.  वाढत्या प्रदुर्शनामुळे कमी होणाऱ्या चिमण्यांची संख्या वाढविण्याकरीता या शाळेतील विध्यार्थीनी सतत प्रयत्न सुरु ठेवले आहे. दरवर्षी या शाळेतील विध्यार्थी जागतिक चिमणी दीना निमित्त असे प्याऊ तयार करतात आणि विशेष म्हणजे शहरात असणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय अधिकारी यांना हे प्याऊ भेट दिले जातात. यावर्षी जागतिक स्थरावरील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या विध्यार्थीनी आपल्या घरी राहून अश्या प्रकारचे फ्याउ तयार केले व
 "सेल्फी विथ खाऊ -प्याऊ " असा उपक्रम राबवीला. या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले आहे. सुट्ट्या संपल्यावर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना हे प्याउ भेट देऊन चिमणी वाचविण्यासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न व्हावा असा संदेशही देणार आहेत. या उपक्रमात सहभागी विध्यार्थीचे माजी आमदार अँड. संजय धोटे, संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर साबनानी ,सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार ,आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे यासह शिक्षक -शिक्षिका यांनी अभिनंदन करीत कौतुक केले.