जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश


चंद्रपूरदि. 22 मार्च (जिमाका) :जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी जमा होऊ नये व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवाजीवनावश्यक वस्तू, किराणा सामानदूध,भाजीपाला,फळे वगळून इतर सर्व दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये,यासाठी खबरदारी म्हणून फक्त जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवाच सुरू असतील. यामध्ये शॉपिंग मॉलदुकाने व आस्थापना मधील फक्त जीवनावश्यक वस्तू, किराणा सामानदूध, भाजीपाला, फळे इत्यादी सेवा वगळून सर्व दुकाने व आस्थापने कायमस्वरूपी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. चिकन व मटन शॉप सुरू आहे. तसेच हॉटेल्सरेस्टॉरंट, खानावळी, फिरते खाद्य विक्री केंद्रचहा टपरी  व इतर खाद्यपदार्थ विक्रीची सर्व दुकाने बंद असून यामधील फक्त पार्सल व होम डिलिव्हरी सुरु आहे. सदर ठिकाणी भोजनजेवण करण्यास सक्त मनाई आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू असणार :

सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, डिस्पेंसरीक्लिनिक्स त्याचबरोबरऔषधालय, केमिस्ट शॉपफार्मसी पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार आहे.

पेट्रोल पंपपोस्ट ऑफिस, बँक, शासकीय कार्यालय काही अटींवर सुरू असणार आहे. यामध्ये, गर्दी नियंत्रण करण्यासाठी नागरिकांना व अभ्यागतांना  प्रवेश करण्यास मनाई असेलशासकीय पत्रव्यवहार फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे करण्यात येणारशासकीय कर्मचाऱ्यांना दररोज न बोलावता आळीपाळीने (रोटेशन) कामावर बोलवण्यात येईल. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रित स्वरुपात अटी व शर्तीवर पुढील आदेशापर्यंत सुरू आहेत.

या सेवा असणार पूर्णता बंद:

सर्व धार्मिक, राजकीयसांस्कृतिकसामाजिक कार्यक्रमशासकीय मेळावेसेमिनारपरिषदा, प्रदर्शने, मोर्चे, स्नेहसंमेलने, यात्रा, ऊरूस, जत्राउत्सव जेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. अशी सर्व कार्यक्रम कायमस्वरूपी पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद असणार आहे.तसेच बसस्थानक,रेल्वे स्टेशन व इतर खाजगी वाहतुक सेवा बंद असणार आहे.

सर्व ग्रामीण व शहरी भागातील सरकारीखाजगीअनुदानित, विनाअनुदानित शाळामहाविद्यालये, अंगणवाड्यावाचनालयेअभ्यासिकाखाजगी शिकवणी वर्ग, तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शैक्षणिक आस्थापनाआयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्राच्या अखत्यारीतील शैक्षणिक आस्थापना कायमस्वरूपी पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद राहणार आहे.

सर्व सभागृहेसिनेमागृहेनाट्यगृहे, जलतरण तलावम्युझियम, व्यायामशाळा, पानठेला  व खर्रा विक्री केंद्रकॅरम क्लब हे कायमस्वरूपी पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद असणार आहे.

पर्यटन स्थळेताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पआनंदवनसर्व आधार केंद्रसेतू केंद्रआठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद असणार आहे. तर, औद्योगिक आस्थापना मधील अत्यावश्यक प्रक्रिया सोडून सर्व प्रक्रियेस मनाई पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे.