रत्नागिरी, दि. ३१ में (जिमाका)- कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत 'कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.
श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.
यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
Artificial intelligence has expanded the boundaries of journalism- Principal Secretary and Director General Brijesh Singh
#Artificialintelligence
#journalism
#SecretaryandDirectorGeneral #BrijeshSingh